Top News कोल्हापूर महाराष्ट्र

‘चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’; भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची मागणी

कोल्हापूर | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपमधूनच करण्यात आली आहे. त्यामुळे पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे या नेत्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटलांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला असल्याचा आरोप कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे पाटलांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला अवघ्या 2 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. तर महाविकास आघाडीने 4 जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपचे बालेकिल्ले असलेले पुणे आणि नागपूर महाविकास आघाडीने आपल्या ताब्यात घेतले.

थोडक्यात बातम्या-

ऐकमेकांची डोकी फोडायचीत तर फोडा, पण विज बिलाचं आश्वासनं पूर्ण करा- देवेंद्र फडणवीसॉ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द!

अजित पवारांनी भर सभागृहात स्वीकारलं सुधीर मुनगंटीवार यांचं ‘ते’ चॅलेंज

फेकुचंद पडळकर म्हणत टीका करणाऱ्या राऊतांना गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

‘भारतात फेसबुकवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण’; राहुल गाधींचा गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या