Top News चंद्रपूर महाराष्ट्र

“देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देण्याची त्यांची ऐपत नाही”

चंद्रपूर | देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देण्याची त्यांची ऐपत नाही. त्यांनी पहिले आपल्या राष्ट्रीय पक्षाची स्थिती पाहून घ्यावी, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री आणि चंद्रपूरचे माजी खासदार हंसराज आहिर यांनी काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

गेल्या दोन टर्मपासून काँग्रेस विरोधी पक्षनेता बनवू शकलेले नाहीत. इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस पक्षाची असताना खासदार बाळू धानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे असल्याचं हंसराज आहिर यांन म्हटलं आहे.

बाळू धानोरकर यांच्यात विजयाचा उन्माद दिसून आला आहे. विरोधी पक्षाचा नेता बनवायची यांची ताकत नाही, मोदींविरोधात कोणीही लढू शकतं, पण त्यांची भाषा कोणाला पटणारी नसल्याचं आहिर म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यासोबतच मोदींचा ट्रम्प बनवणार असल्याचं धानोरकर म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही?- प्रकाश आंबेडकर

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा

“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”

“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”

“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या