मुंबई | सिडनीमधील तिसरी कसोटी अनिर्णीत राखण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हनुमा विहारीवर भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी टीका केली होती. अशातच या टीकेला हनुमा विहारीने बाबुल सुप्रियो यांना मजेशीर रिप्लाय दिला आहे. हनुमा विहरीने दिलेल्या रिप्लायवर भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागला हसू आवरलं नाही.
हुनमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली आहे, असं बाबुल सुप्रियो यांनी म्हटलं होतं. सुप्रियोच्या ट्विटला प्रतिसाद देताना विहारीने आपलं संपूर्ण नाव लिहिलं आहे.
हनुमा विहारी लिहिण्याऐवजी सुप्रियो यांनी ‘हनुमा बिहारी’ असं लिहिलं होतं. हीच चूक हनुमाने सुधारली आहे. बाबुल यांनी टीकेपेक्षा आपल्या नावाला अधिक महत्व असल्याचं अप्रत्यक्षपणे विहारीने म्हटलं आहे.
दरम्यान, हनुमा विहारीन दिलेल्या प्रत्युत्तरावर सेहवागने आपली प्रतिक्रिया दिल आहे. ‘अपना विहारी सब पर भारी’, असं सेहवागने म्हटलं आहे.
Apna Vihari , Sab par Bhaari ! pic.twitter.com/PoHqWHUIwV
— Virender Sehwag (@virendersehwag) January 13, 2021
थोडक्यात बातम्या-
एनसीबीने जावयाच्या घरी धाड टाकल्यानंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
संकटं येतच राहतात मात्र सत्याचा पराभव कधीच होत नाही- रेणू शर्मा
महिलेसोबत नको त्या गोष्टीवर चर्चा; तीन यूट्यूबर्सना पोलिसांकडून अटक
Freedom 251 मोबाईल आठवतो का?, त्याच्या मालकाला नव्या घोटाळ्यात अटक
“कृषी कायद्यांना स्थगिती देऊन लक्ष्मण रेषा ओलांडली, कोर्टाला अचानक एवढी तत्परता आली कोठून?”