बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदीजींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्रेडिंगमध्ये

नवी दिल्ली | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यांना जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त  भाजपतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर मोदी रोजगार दो, अखंड पनौती दिवस, राष्ट्रीय बेरोजगार दिवस हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

बेरोजगाराच्या मुद्दयावरून विरोधकांनी मोदी आणि भाजपला आज चांगलंच घेरलं आहे. तसेच लोक पंतप्रधानांना त्यांच्या वाढदिवसादिवशी ‘दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत’ विचारत आहेत. प्रश्न विचारणाऱ्यांची यादी तरुणांपासून ते राजकीय दिग्गजांपासून ते निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांपर्यंत आहे.

लोक त्यांच्या पद्धतीने प्रश्न विचारत आहेत. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीही पंतप्रधानांवर निशाणा साधला आणि म्हणाले, भारतीय पंतप्रधानांसाठी किती लाजिरवाणा वाढदिवस आहे, संपूर्ण देश त्यांना राष्ट्रीय बेरोजगार दिनाच्या शुभेच्छा देत आहे.

प्रमुख विरोधी पक्ष काॅंग्रेसने देशभर बेरोजगार दिवस स्वरूपात मोदींचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे. देशभर युवक काॅंग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा केला जात आहे. यंग इंडिया के बोल या नावाने भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात मोदी यांनी देशातील बेरोजगारी कशी वाढवली आहे. देशातील विविध क्षेत्रांत नुकसान होत आहे. ते दाखवण्याचं काम युवक काॅंग्रेसतर्फे करण्यात येत आहे.

 

थोडक्यात बातम्या 

‘हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल’; संजय राऊतांचा इशारा

“इम्तियाज जलील यांना निवडून आणण्याच्या पापात आम्ही सुद्धा भागीदार”

…म्हणूून आज मुंबईमध्ये महिलांसाठी होणार विशेष लसीकरण!

“PM मोदी आणि ICMR च्या अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी”

भारताचा रेकाॅर्ड! कोरोना लढ्यात बाकीच्या देशांना जमलं नाही ते भारताने करून दाखवलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More