…तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डमरु वाजवत होते का?- हार्दिक पटेल

अलिबाग | मराठा समाजाने आरक्षणासाठी शांततेत 52 मोर्चे काढले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डमरु वाजवत होते का?, असा सवाल पाटीदार नेता हार्दिक पटेलने केला आहे. संभाजी ब्रिगेडच्या अलिबागमधील महाअधिवेशनात तो बोलत होता. 

कोरेगाव भीमाच्या निमित्ताने मराठा विरुद्ध दलित वाद रंगवला जातोय, असा आरोप यावेळी हार्दिक पटेलने केला. 

अलिबागच्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात बोलताना हार्दिकने मराठा आरक्षणाच्या मागणीचं जोरदार समर्थन केलं. मोदी सरकारच्या कारभारावरही त्याने टीका केली. 

दरम्यान, हार्दिकने नुकतीच धनगर समाजाच्या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. 

महत्त्वाच्या बातम्या-

-सत्य बोलल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नाकाला मिरच्या झोंबल्या!

-महेंद्रसिंग धोनीनं घेतलेल्या या कॅचची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा

-अरे यु डर्टी डर्टी गर्ल… सोशल मीडियावर सनी लिओनीच्या नव्या गाण्याचा धुमाकूळ

-जलयुक्त शिवारचा राज्याला फायदाच; मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

-शिवसेनेच्या विरोधामुळे सरकारवर काहीही फरक पडत नाही- मुख्यमंत्री