Top News देश

कार्यकारी अध्यक्ष होताच हार्दिक पटेलांनी केलं चुकीचं ट्विट, ट्रोल झाल्यावर केलं डिलीट

अहमदाबाद | काँग्रेसनं गुजरातमध्ये युवा नेतृत्वाला संधी देताना मोठा निर्णय घेतला आणि गुजरात काँग्रेसचं कार्यकारी अध्यक्षपद हार्दिक पटेल यांना बहाल केलं. या आनंदात हार्दिक पटेल यांनी एक ट्विट केलं, मात्र ट्रोल झाल्यानंतर त्यांना हे चुकीचं ट्विट लक्षात आलं आणि त्यांनी ते डिलीटही केलं.

आदरणीय अध्यक्षा सोनिया गांधी जी एवं राहुल गांधी जी का आभार व्यक्त करता हूँ। लोकतंत्र एवं संविधान के बचाव के लिए कांग्रेस पार्टी लड़ती रहेगी। गुजरात के विभिन्न मुद्दों को महत्व दिया जाएगा और 2022 के गुजरात विधानसभा चुनाव में 1/3 बहुमत के साथ कांग्रेस सरकार बनायेंगी।, असं हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

वास्तविकपणे सरकार स्थापन करण्यासाठी 2/3 बहुमाताची गरज असते मात्र हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये 1/3 बहुमत मिळवून सरकार स्थापन करु, असं म्हटलं होतं. लोकांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली तसेच त्यांना यामुळे जोरदार ट्रोल व्हावं लागलं.

दरम्यान, चूक लक्षात आल्यानंतर हार्दिक पटेल यांनी हे ट्विट डिलीट केलं, तसेच मूळ ट्विटमध्ये योग्य बदल करुन पुन्हा ट्विट केलं. मात्र हार्दिक पटेल यांची ही चूक आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय होताना दिसत आहे.

हार्दिक पटेल यांनी केलेलं चुकीचं ट्विट-

हार्दिक पटेल यांनी केलेलं सुधारित ट्विट-

महत्त्वाच्या बातम्या-

दया नायकांनी पकडलेल्या विकास दुबेच्या हस्तकांना एन्काऊंटरची भीती, केली ‘ही’ मागणी

राजभवनात कोरोनाचा शिरकाव…राज्यपालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात…

‘लवकरात लवकर जयपूरला या…’ दिल्लीत ठाण मांडलेल्या आमदारांना मुख्यमंत्री गेहलोतांचे आदेश

धारावी कोरोनामुक्तीचं श्रेय सरकारचं नसून RSSचं, स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून काम केलं- चंद्रकांत पाटील

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, सचिन तेंडुलकरचं लगोलग ट्विट, म्हणतो…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या