“इंग्रजांच्या काळापासून मराठ्यांना आरक्षण,पण काँग्रेसनं ते काढून घेतलं”

औरंगाबाद | इंग्रजांच्या काळापासून मराठ्यांना आरक्षण होतं. पण काँग्रेसनं ते 1965 मध्ये काढून घेतलं, असा घणाघाती आरोप विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसवर केलाय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

मराठ्यांना कुणबी ठरवून त्याचं आरक्षण काँग्रेसनं घालवलं, असाही आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.

भाजपने मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देऊ असा शब्द दिला होता, तो शब्द आपण पाळला असल्याचा पुनरूच्चार यावेळी त्यांनी केला. 

दरम्यान, मराठा आरक्षणावरून श्रेय घेण्याची स्पर्धा सध्या राजकीय पक्षांमध्ये सुरू असल्याचं पहायला मिळतंय.

महत्वाच्या बातम्या-

“सरकारच्या नाही तर भारतातील 100 कोटी हिंदूंच्या जोरावर राम मंदिर बनेल”

-मराठवाड्याचा स्वतंत्र रणजी संघ हवा- धनंजय मुंडे

-लग्नानंतरही आशियातील सर्वात ‘सेक्सी’ दीपिकाच; प्रियंकाला टाकले मागे

फडणवीसांनी विश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली?- अनिल गोटे

-धनगर आरक्षणासाठी पवारसाहेबांनी मध्यस्थी करावी; याचिकाकर्त्यांची मागणी