पोलिसाची नोकरी द्यायला तू काय भज्जी आहेस का?

Photo- BCCI

अमृतसर | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १७१ धावांनी धडाकेबाज खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौरला पंजाब पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचं समोर आलंय. हरमनप्रीतचे प्रशिक्षक यादविंदरसिंह सोधी यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. 

हालाखीची परिस्थिती असल्यामुळे ६ वर्षांपूर्वी क्रीडा कोट्यातून हरमनप्रीतने पोलीस खात्यात नोकरीसाठी प्रयत्न केले होते. त्यावेळी, “तुला डीएसपी करायला तू काय भज्जी आहेस का?”, अशा शब्दात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हरमनप्रीतची खिल्ली उडवली होती.

दरम्यानच्या काळात खासदार सचिन तेंडुलकरच्या शिफारशीमुळे तिला रेल्वेत नोकरी मिळाली.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या