बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जाळ आणि धूर संगटच!!! कार्यकर्त्यांनी नेत्यांना उभं केलं उडत्या गरुडावर

इंदापुर  |  विधानसभेचं राजकारण चांगलंच तापू लागलंय. नेते घरोघरी जाऊन, रॅली काढून, सभा घेऊन प्रचार करत आहेत. मात्र नेत्यांचे कार्यकर्ते देखील तितकेच इरेला पेटले आहेत. इंदापुरची लढत महाराष्ट्रातल्या रोमहर्षक लढतीपकैकी एक मानली जात आहे. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यात ही लढत होत आहे. हा संघर्ष चांगलाच पेटलेला पहायला मिळतोय.

दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते अतिशय उत्साही झालेले पहायला मिळत आहेत. कार्यकर्त्यांच्या शह-प्रतिशहाच्या राजकारणात लोकांची मात्र चांगलीच करमणूक होत असून फोटोशाॅप करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना थेट गरूडावरच उभं केलंय. आता हेच फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेत. यावरून ही लढत किती रंजक असणार आहे, याचा अंदाज लावता येईल. 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More