बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दाखवतो हर्षवर्धनचा ड‌ॅशिंग रूबाब… आता चंद्रकांत खैरे खासदार होणार नाही”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुर्वीचे सहकारी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घरवापसी करताच गर्जना केली आहे. माझ्या मनसे प्रवेशाने आता औरंगाबादचे राजकारण बदलणार असून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे खासदार होणार नसल्याचे भाकित वर्तवलं आहे.

मी औरंगाबाद लोकसभा लढवली त्यावेळी जनतेने माझ्या पारड्यात 3 लाख मतं टाकली. महाराष्ट्रात कोणत्याही अपक्ष उमेदवाराला एवढी मतं मिळाली नाहीत. त्यामुळे मी हवेत गोळ्या झाडत नाहीत. येणाऱ्या काळात मी माझी ताकद दाखवून देईल, असं म्हणत जाधवांनी खैरेंना  चंद्रकांत खैरे यांना इशारा  दिला आहे.

मधल्या काळात जरासं भटकल्यासारखं झालं होतं. काही गैरसमज झाले होते आणि ते गैरसमज आता दूर झाले आहेत. त्यामुळे घरवापसीचा आनंद होत आहे, असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी गेल्या 1 महिन्यांपूर्वीच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरेंची भेट ही महत्वाची मानली जात होती. याच भेटीत घरवापसीची चर्चा झाली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

महामोर्चाआधी मनसेला गुड न्युज; या दोन नेत्यांनी केला ‘मनसे’ प्रवेश!

शेतकरी कर्जमाफीच्या हिशोबात बँकाकडून गडबडी?

महत्वाच्या बातम्या-

“मी महाराष्ट्राची मुलगी; घाबरणार नाही, गप्प बसणार नाही”

ठाकरे सरकारच्या कर्जमाफीचा फायदा गावातील 5 लोकांनाही मिळत नाही- राजू शेट्टी

माझं अंतर्मन सांगतंय की दिल्ली भाजपच जिंकणार- मनोज तिवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More