सरकारला आरक्षण द्यायचंच होतं तर बेचाळीस हुतात्मे जाण्याची वाट का पाहिली?-हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल तर त्याचा आनंद निश्‍चितच आहे. पण सरकार आरक्षण देऊ शकत होते तर मग त्यांनी बेचाळीस हुतात्मे होण्याची वाट का पाहिली? असा सवाल मराठा आरक्षणासाठी पहिला आमदारकीचा राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत होते तर मग त्यांनी तीन साडेतीन वर्षाचा वेळ का घालवला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आधी शांतता मोर्चे निघाले, त्यानंतर आक्रमक ठोक मोर्चे काढण्यात आले. आरक्षणाच्या मुद्यावरून नुसतीच आश्‍वसने दिली जात असल्यामुळे उद्विग्न झालेल्या मराठा तरुणांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

दरम्यान, एक नव्हे, दोन नव्हे तब्बल 45 मराठा तरुणांनी बलिदान दिले. यापुर्वीच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असता तर समाज रस्त्यावर उतरला नसता, अन तरूणांचा प्राणही गेला नसता.

महत्त्वाच्या बातम्या-

-माझ्याकडे तुमचा नंबर नाही… हे एेकताच सदाभाऊ खोत तहसिलदारांवर भडकले

-राहुल गांधींना मी नेता मानत नाही; काँग्रेसच्या नेत्याचा घरचा आहेर

-संघाच्या लाठीवर बंदी घालावी; न्यायालयाने बजावली नोटीस

-तुम्ही मला वाघिण म्हणा की नागिण काम मात्र नियमानुसारच होणार!

पृथ्वीराज चव्हाणाची अवस्था पिंजऱ्यातल्या वाघासारखी झाली आहे- दिवाकर रावते