औरंगाबाद महाराष्ट्र

“श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन लाचार, औरंगाबादची बजाज कंपनी बंद करा”

औरंगाबाद | औरंगाबाद येथील बजाज कंपनी बंद करण्याची मागणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. तसेच बजाज कंपनीतून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन लाचार झाल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी यूट्यूबवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी बजाज कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे.

औरंगाबाद येथील बजाज कंपनीत जवळपास 140 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन किती लाचार झालंय हे आता त्यातून दिसतंय. बजाजचे खिशे भरण्यासाठी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात टाकणं हे भयंकर आहे. मी प्रशासनाचा निषेध करतो, असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय.

कामगारांचा जीव धोक्यात टाकून कंपनी चालत असेल तर ती कंपनी काहीच उपयोगाची नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की, तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देवून ही कंपनी बंद करा, असं हर्षवर्धन जाधव यांंनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

आषाढी एकादशीनिमित्त अमिताभ बच्चन यांनी दिल्या मराठीमध्ये शुभेच्छा, म्हणाले….

‘साहेब माझा विठ्ठल’, पुढचा 1 महिना आव्हाड करणार पवारांवर ‘खास सिरीज’!

भारताविरोधात चीनची नवी खेळी; भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या