शिवसेनेशी संबंध नाही; दोन दिवसात नवीन पक्षाची घोषणा करणार- हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | शिवसेनेशी माझा कसलाही संबंध नाही, येत्या दोन दिवसात मी माझ्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार आहे, असं मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनाम देणारे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केलं. ते आयोजित चिंतन बैठकीत बोलत होते.

आतापर्यंत सगळ्याच राजकीय पक्षांनी जाती-जातीत तेढ निर्माण करत सामाजिक विषमता कशी वाढेल असेच प्रयत्न केले. ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी मी नव्या राजकीय पक्षाची स्थापना करतो आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पक्षाचे नाव जाहीर करीन. आता नवा पक्ष काढत असल्यामुळे माझा शिवसेनेशी कुठलाही संबंध राहणार नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान,  मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे फक्त मराठा समाजाला आरक्षण दिले तरी तो मी मागे घेणार नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-साताऱ्यामध्ये भाजपचाच खासदार होणार; चंद्रकांत पाटलांचं उदयनराजेंना आव्हान

-दिमाग मै भुसा… अभिनेते सचिन पिळगावकरांचं नवीन गाणं…

-शिवसेनेच्या मदतीमुळेच जळगाव महापालिकेत भाजपच्या महापौर

-हिंदू राष्ट्र झाले तर देशाच्या चिरफाळ्या उडतील!

-…म्हणून पुणे महापालिकेत विरोधक चक्क हेल्मेट घालून बसले!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या