बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हरियाणाच्या मुख्यमंत्र्याचं काश्मीरवरून वादग्रस्त वक्तव्य; म्हणतात…

हरियाणा | हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काश्मीरी मुलींबाबत केलेल्या वक्तव्यावर नवीन वाद निर्माण झाला आहे. मोदी सरकारने काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे आम्ही काश्मीरी सून आणू शकतो. असं वादग्रस्त वक्तव्य खट्टर यांनी केलं आहे.

हरियाणामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे आमच्याकडचे लोक आधी बिहारमधून सून आणणार असं म्हणत होते. आता काश्मीरचा रस्ता मोकळा झाला आहे. त्यामुळे काश्मीरच्या मुली आणू, असं वक्तव्य खट्टर यांनी केलं आहे.

आपण केलेल्या वक्तव्यामुळे वाद होवू शकतो असं जेव्हा खट्टर यांच्या लक्षात अलं तेव्हा त्यांनी हे वक्तव्य मस्करीत घ्या, असं आवाहनही केलं.

दरम्यान, कलम 370 लागू असतानाही काश्मीर मुलींसोबत विवाह करण्यात कोणताही कायदेशीर विरोध नव्हता.

महत्वाच्या बातम्या-

-अजून मी म्हातारा झालेलो नाही- शरद पवार

-शिरूरकरांनी दिलेली मदत घेऊन खासदार अमोल कोल्हे पूरग्रस्तांच्या भेटीला

-ब्रह्मनाळमधील बोट उलटल्याची दुर्दैवी घटना; मृतांच्या संखेत वाढ…

-माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग निवडणुकीच्या रिंगणात!

-आमदार-खासदार निवडून आले की कोल्हापूरला… पूर येऊन 5 दिवस झालं तरी ठाकरे ‘मातोश्री’तच!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More