बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्या पत्रामागे खूप मोठं कारस्थान, परमबीर सिंहांना माफीचा साक्षीदार करणार”

मुंबई | परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या धक्कादायक आरोपामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते सत्ताधाऱ्यांवर या प्रकरणावरून तुटून पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी परमबीर सिंग यांच्यावर आरोप करत भाजपला टोले लगावले आहेत.

मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांना माफीचा साक्षीदार करायचं ठरवलं आहे. त्यामुळे त्यांनी गृहमंत्र्यांवर खोटे आरोप केले आहेत. त्यांनी लिहलेल्या पत्रामागे खूप मोठं कारस्थान आहे, असं म्हणतं हसन मुश्रीफ यांनी भाजपवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे दोन दिवस दिल्लीत जाऊन बसले होते. त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली होती. यानंतर या प्रकारात लगेचच परमबीर सिंग यांचं पत्र समोर आलं होतं. त्यामुळे माझा संशंय अधिकच बळावला आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

माझ्या मते परमबीर सिंग यांना माफीचा साक्षीदार करायचे ठरवलं आहे. त्यामुळे त्यांनी एवढं मोठं धाडस केलं. अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी हा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेते आणि मंत्री गृहमंत्र्यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. तर खुद्द शरद पवार अनिल देशमुखांच्या बचावासाठी पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत.

राज्य दहशतवादविरोधी पथकाने हिरेन मृत्यूप्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावला. मात्र, या गोष्टीवरून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांकडून परमबीर सिंह यांच्या पत्राचा मुद्दा उचलून धरण्यात आला, असा आरोप शरद पवारांनी केला.

थोडक्यात बातम्या- 

मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात ‘इतक्या ‘लोकांचा सहभाग, एटीएसला मिळाली मोठी माहिती

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, उलट केंद्र सरकारच बरखास्त करा”

माही रिटन्स! मैदानावर येताच धोनीनं टोलवला 114 मीटरचा सिक्स; पाहा व्हिडीओ

धक्कादायक! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘या’ महिलेनं केली तक्रार दाखल

महिलेचा मोदींसोबत फोटो छापून आला, वास्तव समोर आल्यावर उडाली खळबळ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More