महाराष्ट्र मुंबई

“चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम, सत्ता गेल्याने त्यांची अवस्था मनोरुग्णासारखी झालीये”

मुंबई | काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. त्या टीकेवरुन राज्याचे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी त्यांचा समाचार घेतला.

चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, अशी घणाघाती टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्णासारखी झाली आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील ते असे वक्तव्य करत आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. ते किती भाग्यवान आहेत. पण या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही, असा टोला हसन मुश्रीफ यांनी  चंद्रकांत पाटील यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या-

“बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं पण…”

सांगितलं होतं पवारांचा नाद करू नका, पण..- धनंजय मुंडे

शहीद जवान संग्राम पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरात दाख

“पक्षात कुणालाही कोणतंही पद मिळतं, फाईव्ह स्टार कल्चरने निवडणुका जिंकता येत नाहीत”

गोव्यात समविचारी पक्षांशी युतीची तयारी- प्रफुल्ल पटेल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या