बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे मोदींशी चांगले संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई नाही”

कोल्हापूर | चोक्सीला आणण्यासाठी भारतातून एक आठ सदस्यांचं पथक डोमिनिकाला गेलं होतं. मात्र, डोमिनिका हायकोर्टाने चोक्सीच्या प्रकरणावरील सुनावणी स्थगित ठेवली. त्यामुळे त्याचं भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकलं नाही.यामुळे भारतीय पथकाला परत यावं लागलं आहे. यावर भाष्य करत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

नीरव मोदी आणि चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच या दोघांवर कारवाई केली जात नाही, असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही गुजरातचे आहेत. त्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे चोक्सीला अटक केल्यानंतर देखील आपली तपास यंत्रणा हात हलवत परत येणार हे मला माहीत होतं, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.

दरम्यान, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेच्या काही बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. सीबीआय या दोघांविरुद्ध चौकशी करत आहे.

थोडक्यात बातम्या- 

यंदा पायी वारी झालीच पाहीजे, आम्ही तडजोड स्वीकारणार नाही- तुषार भोसले

तुमच्या जिल्ह्यात काय सुरू अन् काय बंद? ; वाचा संपुर्ण महिती

जवान देवदूतासारखे धावून आले अन् लोकलखाली जाता जाता वाचला प्रवासी, पाहा व्हिडीओ

कोरोनासारखी संकटे पुढेही येऊ शकतील- नरेंद्र मोदी

नोकरीची सुवर्णसंधी; कोकण रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More