बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तो भारतासाठी खूप काही करू शकतो’; वर्ल्ड कपआधी कपिल देव यांनी केलं ‘या’ खेळाडूचं कौतुक

नवी दिल्ली | क्रिकेटचा सर्वात रोमांचकारी प्रकार असणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकाला सुरूवात झाली आहे. माजी क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, निवेदक आपापल्या सर्वोत्तम खेळाडूची नावं जाहीर करत आहेत. भारतीय संघ या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशातच महान क्रिकेटपटू आणि माझी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय खेळाडूची स्तुती केली आहे.

भारतीय संघ सध्या पूर्ण लयीत आहे. कपिल देव यांना कोणता खेळाडू मैदानात खेळताना आवडेल असं विचारलं होतं. यावर उत्तर देताना देव यांनी भारतीय सलामीवीर फलंदाज के.एल राहुल आपल्याला सर्वात जास्त आवडत असल्याचं म्हटलं आहे. देव पुढे म्हणाले की, केएल राहुलचा खेळ मला खूप आवडतो. तो खेळत असलेल्या शाॅट्सवर त्याचा खूप विश्वास असतो. मला वाटत की, येणाऱ्या काळात भारतीय क्रिकेटसाठी केएल राहुल खूप काही करू शकतो, असा विश्वास कपिल देव यांनी केएल राहुलबाबत वर्तवला आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं नाव कपिल देव घेतील असा अंदाज होता. पण तो अंदाज देव यांनी खोटा ठरवला आहे. के.एल राहुल सध्या जबरदस्त फाॅर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये राहुलच्या बॅटमधून चौकार-षटकारांची बरसात झाली होती. सध्या विश्वचषकाच्या पूर्वतयारीत रमलेल्या भारतानं दोन्ही सराव सामन्यात विजय मिळवला आहे. केएल राहुलनं दोन्ही सराव सामन्यात जोरदार फटकेबाजी केली आहे.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याअगोदर सलामीवीर म्हणून रोहितच्या जोडीला कोण येणार याची सर्वत्र चर्चा होती. पण विराट कोहलीनं पहिला सराव सामना सुरू होतानाचं स्पष्ट केलं की केएल राहूल सध्या चांगल्या फाॅर्ममध्ये असल्यानं आम्ही केएल राहूलला सलामीवीर म्हणून खेळवणार आहोत. अशातच आता कपिल देव यांनी केएल राहुलची भरभरून स्तूती केल्यानं सर्वत्र राहुलच्या कामगिरीचं कौतूक होत आहे.

थोडक्यात बातम्या 

मॅंचेस्टर युनायटेडची आयपीएलमध्ये एन्ट्री; ‘हा’ संघ विकत घेण्याची शक्यता

‘मालदीव आणि दुबईमध्ये त्यांची…’; नवाब मलिकांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

बाॅलिवूडमध्ये पुन्हा खळबळ! ड्रग्ज प्रकरणी आता अभिनेत्री अनन्या पांडेला समन्स

सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे सेकंड हॅंड कारला आले ‘अच्छे दिन’

शाहरूख खान लेकाच्या भेटीला तर ‘मन्नत’वर एनसीबीचा छापा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More