बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चोरीनंतर झालं असं काही की… चोराला अत्यानंदानेच आला हृदयविकाराचा झटका 

लखनऊ | उत्तरप्रदेशातील चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. बिजनौर येथील कोठीवाडा ग्रामीण भागातील सार्वजनिक सेवा केंद्रामध्ये झालेल्या चोरीबाबत पोलिसांनी तपास करत बुधवारी एकाला अटक केली आहे. चौकशी दरम्यान या प्रकरणात दोन जणांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यातल्या एका चोराला अनपेक्षितपणे एवढी रक्कम मिळाल्यानं आनंदाच्या भरात त्याला  हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळं चोरी केलेल्या रकमेतील काही रक्कम त्याला उपचारासाठी वापरावी लागली असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं आहे.

बिजनौरचे पोलिस अधीक्षक धरमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 आणि 17 फेब्रुवारीच्या रात्री दोन चोरांनी नवाब हैदर यांच्या मालकीच्या सार्वजनिक सेवा केंद्रात चोरी केली. त्यानंतर हैदर यांनी त्यांच्या केंद्रातून सात लाख चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत तपास करायला सुरूवात केली आणि दोन जणांना अटक करत या प्रकरणाचा छडा लावला आहे. नौशाद आणि अजीज असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघेही अलिपूर आणि नगिना पोलीस स्थानकाच्या हद्दीतील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेऊन त्यांना एका हाॅटेलमधून अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

‘दोन्ही आरोपी अट्टल चोर आहेत. त्यांच्याविरोधात अनेक पोलीस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल आहेत. त्यांनी सार्वजनिक सेवा केंद्रामध्ये सात लाखांची चोरी केल्याचा गुन्हा कबुल केला आहे. या केंद्रामध्ये काही हजार रुपये आपल्याला मिळतील असा अंदाज लावल्याची माहिती त्या दोघांनी दिली आहे. मात्र जास्त पैसा या केंद्रातून मिळाला आणि मिळालेला पैसा त्यांनी अर्धा अर्धा वाटून घेतला. मात्र त्यानंतर लगेचच अजीजला हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारासाठी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या साडेतीन लाखांपैकी बराच पैसा अजीजने उपचारांवर खर्च केला. तर नौशादने त्याचे पैसे दिल्लीत सट्ट्यामध्ये उडवले’, असं पोलिस अधीक्षक सिंह यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या दोघांकडून पोलिसांनी 3.7 हजार रोख रक्कम, दोन पिस्तुल आणि एक चोरलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीमला पाच हजाराचं बक्षीस देण्यात येईल, असा निर्णय पोलीस दलाने घेतल्याची माहिती सिंह यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या

BCCI चा उद्धटपणा; विराट कोहलीने केलेल्या त्या टीकेला BCCI चं प्रत्युत्तर

धक्कादायक! मुलानं आत्महत्या केली तिथेच आईनेही आयुष्य संपवलं

अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचं कॅनडामध्ये निधन!

पुणे पोलिसांचा ‘मोक्का पॅटर्न’; 175 गुन्हेगारांवर केली धडक कारवाई

“नरेंद्र मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाला”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More