बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मरेल पण भाजप सोबत जाणार नाही’; प्रियंका गांधींचं भाजपवर शरसंधान

लखनऊ | आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचा चेहरा म्हणुन प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमधून खिंड लढवताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी प्रियंका गांधी यांची गणना केली जाते. प्रतिज्ञा रॅलीत प्रियंका गांधी यांनी गोरखपुरमध्ये भाजपसह समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला आहे.

यावेळी प्रियंका गांधी यांनी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. आज सपा, बसपा म्हणत आहेत की काँग्रेस भाजपसोबत मिळाली आहे. जेव्हा संघर्ष असतो, संकट असते त्यावेळेस तुम्ही कुठे असता?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. संघर्ष असतो, संकट असते त्यावेळेस तुमच्याजवळ कोणी येत नाही. मी मरेल पण भाजपसोबत कधीच जाणार नाही, असं प्रत्युत्तर प्रियंका गांधी यांनी दिलं आहे.

आपण कोणत्याही वर्गाचं उदाहरण घ्या, मागासवर्ग, कोणीही गरिब असो, अल्पसंख्यांक असो, ब्राम्हणांच्या सोबतसुद्धा अन्याय करण्यात आला आहे, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. गरिबांचं शोषण झालं आहे, गुरू गोरक्षनाथांच्या विचारांच्या विपरित योगी आदित्यनाथ यांचं सरकार सुरू आहे. सरकार जनतेप्रति आग ओकत आहे. दररोज जनतेवर आक्रमण होत आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी लखीमपुर खीरी घटनेचाही उल्लेख केला. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्य केलं होतं की, उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगार शोधायचा असेल तर दुर्बिण लावावी लागेल. त्यावरून प्रियंका गांधी यांनी लखीमपुर घटनेत ज्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडलं आहे ते अजय मिश्रा त्यांच्या शेजारी बसले आहेत. मला त्यांना सांगायचं आहे की, दुर्बिण सोडा चष्मा घाला, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

शाब्बास पु्णेकर! पुण्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्युची नोंद नाही

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

मोठी बातमी! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघात मोठे बदल; सलामीला उतरणार ‘हा’ धमाकेदार फलंदाज

“महाविकास आघाडी ही क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ टीम”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More