बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुषार भोसले माफी मागा नाहीतर…’; ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक

नाशिक | गेल्या काही दिवासांपासून भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. नुकतंच चर्चेत असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर तुषार भोसले यांनी टीका केली होती. त्यावेळी तुषार भोसले यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावं लागलं, त्यांच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल, अशी खालच्या स्तरावरील टीका तुषार भोसले यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी अनेक नेत्यांनी तुषार भोसले यांच्यावर टीका केली आहे.

खरे म्हणजे तुषार भोसले याची पात्रता काय आणि तो बोलतो काय, अशी स्थिती आहे. तुषार भोसलेने तातडीने माफी मागावी. अन्यथा त्याला शहरात फिरू देणार नाही, अशा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपचा हा माणूस सातत्याने काहीना काही सतत गरळ ओकत असतो. तुषार भोसलेला अध्यात्म या शब्दाचा अर्थ माहिती आहे का?,असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘एक बाप म्हणून मी खूप…’; आर्यन खानच्या जामिनानंतर आर. माधवनचं ट्विट

अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; दिवाळीआधी प्रवाशांना मोठा दिलासा

“मोहम्मद आमीरची इतकी औकात नाही की, मी त्याच्याबद्दल बोलावं”

“मला आता ‘बाबूराव गणपतराव आपटे’ पात्रातून सुटका हवी आहे”

“सुजय विखे पाटलांनी चांगलं काम केलंय, त्यांना चांगला जावई मिळेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More