बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या’; वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथील शिळा मंदिरांचे लोकार्पण करण्यात आलं आहे. वारकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पगडी, उपरणे आणि तुळशीचा हार देऊन सत्कार केला. यावेळी वारकऱ्यांशी संवाद साधातांना पंतप्रधानांनी संत तुकाराम महाराजांच्या वचनांचा उल्लेख केला आहे. तसेच पालखी महामार्गाच्या कामासंदर्भात पंतप्रधानांनी घोषणा केली आहे. कार्यक्रमावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

‘मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या’असं म्हणत पंतप्रधानांनी वारकऱ्यांना नमन केलं. देहूच्या तीर्थक्षेत्रावर येण्याचं सौभाग्य मिळालं. देहूत पांडूरंगाचा सदैव निवास आहे. देहू ही संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, असं पंतप्रधान म्हणाले. तसेच संत ज्ञानेश्वरांच्या पालखी महामार्गाचे काम पाच टप्प्यात होणार आहे आणि संत तुकारामांच्या पालखी महामार्गाचे काम तीन टप्प्यात पुर्ण केले जाणार आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. या कामांसाठी 11 कोटींपेक्षा अधिक खर्च होणार असून पंढरपूर पालखी मार्गाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

संत बहिणाबाईंनी संत तुकारामांना कलश, असं  म्हटलेलं आहे. संत तुकारामांनी भूक पाहिली, भूकबळी पाहिले. ज्यावेळेस बाकीचे लोक आशा सोडून देत होते त्यावेळेस संत समाजासाठी आशेचा किरण होते, असं पंतप्रधान म्हणाले. जे भंग होत नाही त्याला अभंग म्हणतात. संत तुकारामांचे अभंग आपल्याला ऊर्जा देत आहेत. पंतप्रधानांनी अनेक संताचा उल्लेख करत संत चोथामेळा यांच्या सार्थ अभंगगाथेच्या प्रकाशन करण्याची संधी मला मिळाली हे माझे सौभाग्य समजतो, असं म्हटलं आहे.

उच्च निच काही नेणे भगवंत, असं संत तुकारामांनी सांगितलं. हा संदेश जेव्हढा भगवत भक्तीसाठी उपयुक्त आहे देशासाठी देखील तेव्हढाचं उपयुक्त आहे. देशात सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास यानुसार आपले सरकार करत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनामध्ये संत तुकारामांनी महत्त्वाची भूमिका घेतली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, थोड्याच दिवसांमध्ये पंढरपुरची यात्रा सुरू होणार आहे. अशा यात्रा आपल्या विविधतेला जोडत आहे.  आज अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचे मंदिर होतं आहे. पुर्ण देशामध्ये तीर्थ स्थानांचा विकास करण्यात येत आहे. या आठ वर्षांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पंचस्थानांची विकास झाला आहे. संत तुकाराम महराज म्हणायचे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. तसेच पंतप्रधानांनी जय जय रामकृष्णहरी म्हणत भाषणास पुर्णविराम दिला.

थोडक्यात बातम्या- 

“…म्हणून शरद पवारांनी राष्ट्रपती होऊ नये”

पंतप्रधान नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने वारकरी आहेत- देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा; भारतात 10 लाख नोकऱ्या देणार

राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 54 रुपयांत एक लिटर पेट्रोल

SBI च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; बँकेने घेतला मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More