देश

देशभरातील 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

नवी दिल्ली | देशभरातील 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात  एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. याशिवाय कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण आता 22.17 टक्क्यांवर आलं आहे, अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

देशात गेल्या 24 तासात 1463 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात 24 तासातील मृत्यूचा हा सर्वाधिक आकडा आहे.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 28,380 वर पोहचला आहे. यापैकी 6,362 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 886 रुग्णांचा बळी गेला आहे. देशात सध्या 21, 132 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासात 381 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशभरात आतापर्यंत 6,362 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशीदेखील माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेनंतर लाॅकडाऊन वाढवण्याविषयी अनिल देशमुख म्हणतात…

“लॉकडाउनचा कालावधी वाढला तर लाखो भारतीय गरीबीच्या चक्रात फसतील”

लॉकडाउन कुठे कडक आणि कुठे शिथिल करणार?; नरेंद्र मोदींनी केलं स्पष्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या