बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात आज कोरोनाचे ३३ नवे रुग्ण, पाहा कोणत्या शहरात किती रुग्ण वाढले!

मुंबई |  राज्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढत चाललेला आहे. आज राज्यात 33 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या 335 वर जाऊन पोहचली आहे.

नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ३०, पुण्याचे २ आणि बुलढाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. तर कोरोनाबाधितांपैकी आज तीन रूग्णांचे देखील मृत्यू झाले आहेत. यामध्ये दोन मृत्यू मुंबईत तर एक व्यक्तीचा मृत्यू पालघर या ठिकाणी झाला आहे. या तिन्ही रुग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही, असं सांगत आतापर्यंत राज्यात १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

कोरोनाबाधितांमध्ये मुंबईचे १८१, पुणे ५०, ठाणे ३६, सांगली २५, नागपूर १६, अहमदनगर ८, यवतमाळ ४, बुलढाणा ४, सातारा व कोल्हापूर प्रत्येकी २, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, गुजरात प्रत्येकी १ यांचा समावेश आहे, अशी माहिचीही टोपे यांनी दिली आहे.

दुसरीकडे राज्यात आज ७०५ जण विविध रुग्णालयांत भरती झालेले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांपैकी ७१२६ जणांची विलगीकरण कक्षात भरती झालेले आहेत. त्यापैकी ६४५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना व्हायरसकरिता निगेटिव्ह आलेले आहेत. कोरोना व्हायरसने बाधित असलेले ४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“कठीण काळात देखील पंतप्रधान मोदींनी केअर फंड उघडून प्रसिद्धीची संधी सोडली नाही”

अमेरिकेच्या नागरिकांना यावेळी नक्कीच लाज वाटत असेल; ट्रम्प यांच्यावर भडकली सोनम कपूर

महत्वाच्या बातम्या-

‘झी’च्या ‘या’ दोन लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

तबलिगी जमातीच्या लोकांनी माफी मागावी- हुसेन दलवाई

युवी अन् भज्जीने मदतीचं आवाहन केलं पण पाकच्या शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनसाठी; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More