बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील चार दिवस जोरदार पाऊस; ‘या’ भागात अलर्ट जारी

मुंबई | गेल्या काही आठवड्यांपासून ऐन थंडीतही पावसानं हजेरी लावली आहे. थंडीची लाट सुरु असताना पडणाऱ्या अवकाळी पावसानं नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच अजूनही पावसाचा रोख थांबलेला नसून 6 जानेवारीपासून काही भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

राज्यात ऐन थंडीच्या दिवसात पुढील चार दिवसात विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यात 6 ते 9 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे. 6 जानेवारीला धुळे आणि नंदुरबारमध्ये पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.

सहा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. हा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. या भागात काही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचाही जोर वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गारपीटमुळे आधीच बागायतदार आणि खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट असल्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! राज्यातील सर्व महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद!

‘या’ कारणामुळे सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर करण्यात आला दफनविधी!

‘मला हात लावायचा नाय’; आघाडी सरकारमधील आजी-माजी आमदारांची जुंपली

‘मी कधीच बेसावध नसतो’; भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक

बुस्टर डोसविषयी महत्त्वाची घोषणा, राजेश टोपे म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More