बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीतील पावसाने मोडले सर्व रेकॉर्ड; दिल्लीचं विमानतळ पाण्यात

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसांचं भयान रुप पहायला मिळालं. त्यामुळे नागरिकांची चांगलीच झुंबड उडाली आहे. अशातच आता या पावसानं देशातील सर्वोत्तम विमानतळ इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट पाण्याखाली गेलं आहे.

मुसळधार पावसानं दिल्लीला चांगलंच झोडपलं आहे. याचंच एक दृश्य म्हणजे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. पावसानं संपूर्ण विमातळावर पाणी साचलं आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अचानक झालेल्या या तुफान पावसामुळं प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. विमानतळावर साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना झालेल्या तसदीबद्दल विमानतळ व्यवस्थापनाकडून खेद व्यक्त केला जात आहे.

दिल्लीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पावसाचा तडाखा पहायला मिळत आहे. या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी साचलं आहे. रस्त्यावर सर्वत्र पाणी साचलं आहे. एवढंच काय तर इमारतींमध्येही पाणी शिरलं आहे. याचाच तडाखा विमानतळालाही बसल्याचं दिसतंय.

दरम्यान, शनिवारी दिल्लीत 45 वर्षातील रेकाॅर्डब्रेक पाऊस झाला आहे. या पावसामुळे सगळीकडे हाहाकार माजला आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. यातच थोड्याच वेळात विमानतळावरील पाणी बाहेर काढण्यात येईल, असंही आश्वासन व्यवस्थापनाने दिलं आहे.

 

थोडक्यात बातम्या –  

‘लस घेतली नाही तर…’; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी!

“आम्ही इंचभरही सरकार हलू देणार नाही, याची विरोधकांनाही मनोमन खात्री पटली”

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी!

मुंबई बलात्काराच्या घटनेनं हादरली, अत्यंत अमानुष घटना उघड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More