बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बीड जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; कुंडलिका नदीला पूर

बीड | गेल्या काही दिवसापासूून राज्यातील शेतकरी हा अपुऱ्या पावसाने चिंतेत होता. हवामान खात्याने राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. आता तो अंदाज खरा ठरताना पहायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र पावसामुळे थैमान घातल्याचं दिसतंय. पावसाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या बीड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

कालपासून सुरू असणारा पाऊस अजुनही जोरदार चालूचं आहे. बीड जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वाचा असणारा पाऊस आता शेतीचंच नुकसान पोहचवताना दिसतोय. ओढे, नाले, बंधारे हे तुडूंब भरून वाहत आहेत. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पूर आल्याची माहिती समोर येत आहे.

बीडच्या बिंदुसरा नदीला कडेपर्यंत पाणी आलं आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पावसाने पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाल्यांत अडकलेला कचरा काढला नसल्यानं आता पावसाचे पाणी थेट रस्त्यांवर येत आहे. रस्त्यावर देखील पाणी झाल्यानं परिणामी नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, बीडमधील सिद्धेश्वर बंधारा हा ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे बीडच्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. गेवराई भागाला पण पावसाने जबरदस्त झोडपलं आहे. गेवराई नदीवर असणारा पुल वाहुन गेल्याची घटना घडली. मध्यरात्री पासून सुरू असणाऱ्या पावसाने शेतातील ऊसाचं खुप नुकसान केलं आहे.

थोडक्यात बातम्या

चौकशीला दांडी मारत नारायण राणे दिल्लीला रवाना; वकिलांनी दिलं ‘हे’ कारण

जळगाव जिल्ह्यात पुराचं सावट; नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला

‘…म्हणून सांगतो चड्डीत राहायचं’; नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

राज्यभरात पावसाची संततधार! ‘या’ भागात ढगफूटीसह दरड कोसळली; पाहा व्हिडीओ

देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत तब्बल ‘इतक्या’ हजारांची घट; वाचा आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More