मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात वातावरण तापलेलं पाहायला मिळत असताना अचानकच पाऊस सदृष्यस्थिती निर्माण झाली आहे.
अनेक राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व हालचाली पाहायला मिळत आहेत. राज्यातील वातावरणात बदल झाला असला तरी नागरिकांना कडक उन्हापासून मात्र अद्यापही दिलासा मिळालेला नाही. मात्र, आता तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घट झाल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.
पुढच्या 24 तासात मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे (Rain) नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांना मात्र या पावसाचा फटका बसणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम, अरूणाचल प्रदेश या राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यात प्रामुख्याने द्राक्ष आणि आंब्यांचा समावेश आहे. त्यामुळे परत पाऊस कोसळला तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
थोडक्यात बातम्या-
संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना थेट इशारा, म्हणाले…
“असे हे किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार?”
Raj Thackeray| पुणे दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
युक्रेनसाठी ‘या’ देशांनी घेतला मोठा निर्णय, उचललं महत्त्वाचं पाऊल
Comments are closed.