बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इगतपुरी रेव्ह पार्टीमध्ये अटक झालेल्या हीना पांचाळसह 25 जणांना न्यायालयीन कोठडी

मुंबई | नाशिकमधील इगतपुरीत हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी एका ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीसह 22 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यानंतर आता 25 जणांना या पार्टीमुळे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती.

न्यायालयाने यातील तीन कामगार, एक फोटोग्राफर, एक स्वयंपाकी अशा एकूण 5 जणांना जामीन मंजूर करत उर्वरीत आरोपींना एका दिवसाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले होते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी 3 बंगले सील केल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नाशिकच्या इगतपुरीमधील रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या ‘बिग बॉस मराठी’ फेम हीना पांचाळसह 25 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. काल दुपारी या सर्व संशयित आरोपींना हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

थोडक्यात बातम्या-

शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही – नारायण राणे

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; भाजप नेत्याच्या ‘त्या’ ट्वीटवर उर्मिला मातोंडकर भडकल्या

अभिमानास्पद! पुण्याच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम करत 3 रेकाॅर्ड बुकमध्ये नोंदवलं नाव

पुण्यातील शाळा सुरू करण्यास मिळाला हिरवा कंदील; दीड वर्षानंतर होणार शाळा सुरू!

रूपाली चाकणकरांच्या ‘बंटी-बबली’च्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More