बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अपघात की घातपात? निवृत्त ब्रिगेडर हेमंत महाजन म्हणतात, “चीनने हा…”

पुणे | देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर (IAF Helicopter Crash) दुर्घटनेमध्ये निधन झालं आहे. आज दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी त्यांच्या IAF Mi-17V5 हेलिकाॅप्टरचा अपघात झाला. त्या हेलिकाॅप्टरमध्ये असणाऱ्या 14 पैकी 13 जणांचा मुत्यू झाला आहे. अशातच हा अपघात होता की घातपात?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

निवृत्त ब्रिगेडर हेमंत महाजन (Retired Brigadier Hemant Mahajan) यांनी आज पुण्यात बोलताना बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आणि हा घातपात असण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. वडिलांच्या बटालियनमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. ईशान्य भारतातील घुसखोरी असो किंवा पाकिस्तानविरोधात त्यांनी सर्वाच ठिकाणी चांगलं काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी सीडीएस म्हणून देखील चांगलं काम केलं होतं, असं हेमंत महाजन यांनी म्हटलं आहे.

हवामानात बदल होतो किंवा एखादा पक्षी समोर आला की अशी घटना होण्याची शक्यता असते. मात्र, मला घातपाताची शक्यता वाटते, असं हेमंत महाजन म्हणतात. त्याचबरोबर, यामागे कोणता देश असेल त्यांना जशास तसे उत्तर द्यावेच लागेल. चीन सारख्या देशाने सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे का?, हे देखील आता पहावं लागेल, असंही हेमंत महाजन म्हणाले आहेत. पुण्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, अपघात झालेलं हे IAF Mi-17V5 हे अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर म्हणून ओळखण्यात येतं. रशियन बनावटीच्या या हेलिकाॅप्टरमध्ये दोन इंजिन असतात. तरीही अपघात घडल्यानं सर्वत्र या तर्क वितर्क उपस्थित करण्यात येत आहेत.

थोडक्यात बातम्या

राज्याचं टेन्शन वाढलं! Omicron रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

आधीही असंच घडलं होतं! 6 वर्षापूर्वी ‘त्या’ अपघातात बिपीन रावत थोडक्यात बचावले होते

‘अजिंक्य’पर्व संपण्याच्या वाटेवर?, कसोटी संघाचं उपकर्णधारपद गमावलं

किंग कोहलीला डच्चू! रोहित शर्मा टीम इंडियाचा नवा कर्णधार

“खरंच प्रायश्चित्त करायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More