पुणे महाराष्ट्र

‘हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय’; कंट्रोल रुममध्ये फोन करणाऱ्या पुणेकरांना सुखद धक्का

पुणे | गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणेकरांना सुखद धक्का दिला. विविध तक्रारींसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या पुणेकरांना गृहमंत्र्यांनी स्वत: उत्तर दिलं.

हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय. तुमची तक्रार काय आहे? असं म्हणत तक्रारी लिहून त्यांनी संबंधित विभागातील पोलीस स्टेशनमध्ये कळवल्या.

गेले दहा महिने डॉक्टर, नर्स, पोलीस सगळे जण कोरोनाविरोधात अथक लढा देत आहेत. त्यामुळे पोलीस दलाचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी गृहमंत्री पुण्यात गेले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत केक कापत त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं.

अनिल देशमुख यांनी नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: काही फोन कॉल्सना उत्तरं दिलं. यावेळी एका नागरिकाने सोयायटीमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजत असल्याची तक्रार करण्यासाठी नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यावेळी तुमची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवू असं उत्तर देशमुख यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

कोरोना रुग्णांना वाचवण्यात भारत इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने आघाडीवर- नरेंद्र मोदी

कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही- अजित पवार

“निवडणूक जवळ आल्यावरच शिवसेनेला औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो”

खळबळजनक! भरदिवसा चौकात चादरीत गुंडाळलेला मृतदेह ठेवून दोघे पसार

राज्यातील ‘या’ चार शहरांमध्ये 2 जानेवारीला कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होणार- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या