देश

प्रियांका गांधींवर टिप्पणी करणाऱ्या भाजप नेत्याला हेमा मालिनींनी झापलं

लखनऊ | प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावर टिप्पणी करणाऱ्या भाजप नेत्यांवर भाजप खासदार हेमा मालिनी भडकल्या आहेत. त्यांनी भाजप नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.

अनेक सुंदर महिला राजकारणात आहेत, पण म्हणून त्यांच्या दिसण्यावर टिप्पणी करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे.

अभिनेत्रीला पाहून लोक गर्दी करतात पण चेहरा पाहून लोक मतदान करत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांना राजकारणात स्थान नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी प्रियांका गांधी यांना ‘चाॅकलेट फेस’ म्हणून संबोधलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-राजस्थानच्या रामगडमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपला चारली पराभवाची धूळ

मुख्यमंत्रिपदावर असेपर्यंत भ्रष्टाचार करत रहायचा का?,अण्णांचा सरकारला सवाल

-रोहित शेट्टीचा दिलदारपणा, ‘सिम्बा’च्या कमाईतील मोठा वाटा मुंबई पोलिसांना

-“राहुलजी, आजाराशी संघर्ष करणाऱ्याविषयी खोटं बोलण्याइतके तुम्ही असंवेदनशील”

-भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या