बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणुस बोलतोय- हेमंत ढोमे

मुंबई | सध्या देशातील सर्वांचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात सभा होताना दिसत आहेत. सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक मोठा निर्णय घेतला.

कोरोनाचं संकट पाहता पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय मी घेतला आहे. सद्यस्थितीत अशा सभांमुळे जनता आणि देशाला किती धोका आहे याचा विचार राजकीय पक्षांनी करायला हवा, असं राहुल गांधींनी ट्विट करत सांगितलं. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतूक होत आहे. यावर प्रसिद्ध मराठी अभिनेता हेमंत ढोमेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आत्ताच्या काळात निवडणूका येतील जातील… यश मिळेल नाहीतर अपयश मिळेल पण लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. देशाला आता निवडणुका नकोत तर बेड्स हवेत, औषधं हवीत, ॲाक्सीजन हवाय! जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणुस बोलतोय! पण आपण या माणसावर हसुया, मस्करी करूया… मजेत राहुया, असं हेमंत ढोमेने म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. राज्यात एकूण आठ टप्प्यात मतदान होत आहे. यापैकी पाच टप्प्यांमधलं मतदान पूर्ण झालं आहे. तर तीन टप्पे शिल्लक आहेत.

 

थोेडक्यात बातम्या- 

देशाला लागलेली कोरोनापेक्षा घातक कीड म्हणजे राजकारण- तेजस्विनी पंडीत

पुण्यात बापानं 2 पोरींवर ट्रक चढवला अन् स्वतःलाही संपवलं, कारण अत्यंत धक्कादायक

“हे कृत्य करून तुम्ही चुकलात…याची किंमत मोजावी लागणार”

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये- एकनाथ खडसे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More