एकाने चूक केली म्हणून संपूर्ण पोलीस दल चुकीचं नसतं- हेमंत नगराळे
मुंबई | मुंबई पोलिस दलामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. DGP हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईचं पोलिस आयुक्तपद सोपवण्यात आलं आहे. तर परमबीर सिंग यांची बदली होमगार्ड विभागात करण्यात आली आहे. बदलीनंतर हेमंत नगराळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं आहे. तसेच पोलिसांनीही असं कृत्य करू नये जेणेकरून पोलिसांच्या प्रतिमेला डाग लागेल. अन्यथा कडक कारवाई करू, असा इशाराही नगराळे यांनी यावेळी दिला आहे.
एकाने चूक केली म्हणून संपूर्ण पोलीस दल चुकीचे नसते. मुंबई पोलीस एका कठीण समस्येतून जात आहेत. समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नियुक्ती केली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांंचे सहकार्य लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन नगराळे यांनी केलं.
दरम्यान, हेमंत नगराळे 1987 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. सहावीपर्यंत चंद्रपूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतरचं शिक्षण नागरपूरच्या पटवर्धन हायस्कुलमध्ये VRCE नागपूरमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. त्याचबरोबर नगराळे यांनी फायनान्स मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे. नगराळे यांना राष्ट्रपती पोलिस पदक, विशेष सेवा पुरस्कार, आंतरिक सुरक्षा पदक असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“जे आपण कमावलं नाही ते विकून खायचं हा कोणता धर्म?”
सिक्सर किंग फक्त युवराज सिंगच; एका षटकात ठोकले 4 गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ
खळबळजनक! पराभवानंतर बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या
अंबानींच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात आता मनसेची उडी; बड्या मंत्र्यावर धक्कादायक आरोप
शरद पवारांची मोठी खेळी, काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता
Comments are closed.