बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच मन की बातची टेप लावली’; मुख्यमंत्र्यांची मोदींवर टीका

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेवेळी मोदींनी स्वत:चीच ‘मन की बात’ची टेप लावल्याची टीका झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

आदरणीय पंतप्रधानांनी आज फोन केला. यावेळी त्यांनी फक्त त्यांची मन की बात केली. त्यापेक्षा त्यांनी कामाची गोष्ट केली असती आणि कामाचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं, असा टोला हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणासहित अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्याशी कोविड संकटावर चर्चा केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा मोदींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे.

राज्याला केवळ 2181 रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले आहेत. राज्य सरकार आपल्या स्तरावर बांगलादेशाकडून 50 हजार इंजेक्शन्स मागवू इच्छिते. परंतु केंद्राने अद्याप मंजुरी दिली नाही. याशिवाय झारखंडमध्ये व्हॅक्सिनचं संकटही वाढलं आहे. त्यामुळेच झारखंडमध्ये अद्याप 18 वर्षांवरील युवकांचं लसीकरण सुरू करण्यात आलेलं नाही, असं झारखंडचे आरोग्य सचिव अरुण सिंह यांनी म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“सरकारच्या माध्यमातून धंदा करणाऱ्या लोकांनी राजकीय भाष्य करू नये”

पुण्यातील कडक लाॅकडाऊनबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांचं सुचक वक्तव्य

पु.ल.देशपांडे यांची ‘ती’ व्हिडीओ क्लिप शेअर करत महाराष्ट्र पोलिसांनी दिला महत्वाचा सल्ला

“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गुदमरत आहेत, ते लवकरच आघाडीतून बाहेर पडतील”

कोरोनामुळे ‘या’ भाजप आमदाराचं निधन; आतापर्यंत 4 भाजप आमदार कोरोनाचे बळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More