बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला दिले हे 5 सल्ले

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे कोरोनारूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशभरात कोरोना लसीकरणही चालू आहे. हे लसीकरण गतीमान होण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधा यांच्या पाठोपाठ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेल्या पाच सल्ल्यांमध्ये, आम्ही किती लसीकरण केलं हे पाहण्यापेक्षा किती लोकसंख्येचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिलं पाहिजे. राज्यांना फ्रंटलाईन वर्कर्सच्या श्रेणीची परिभाषा ठरवण्यासाठी राज्यांना अधिकार देण्यात यावेत. तसेच 45 वर्षाखालील लोकांनाही लस देण्यास परवानगी देण्यात यावी.

भारतातील व्हॅक्सीन निर्मात्यांना सवलती दिल्या पाहिजे. इस्रायलच्या धर्तीवर अनिवार्य लायसेंसिंगची तरतूद केली पाहिजे. भारतातील व्हॅक्सीन निर्मात्यांना सवलती दिल्या पाहिजे. इस्रायलच्या धर्तीवर अनिवार्य लायसेंसिंगची तरतूद केली पाहिजे, असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. मात्र लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्या सूचना तुम्ही अंमलात आणाल याची अपेक्षा आहे,  असंही मनमोहन सिंग पत्रात नमूद केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

सुपर कोहलीचा राहुल त्रिपाठीने घेतला अफलातून झेल, पाहा व्हिडीओ

डोक्यात कुऱ्हाड घालून वहिनीने नणंदेची केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल घक्का

आशा आहे 2 मेपर्यंत पाय ठीक होईल, निदान राजीनामा देण्यासाठी तरी चालत जाता येईल- अमित शहा

‘कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी…’; शरद पवारांनी केलं ‘हे’ आवाहन

‘प्लीज मदत करा’, मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या भावालाच मिळेना बेड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More