बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बिग बाॅस मराठी 3’ मध्ये झळकणार हे कलाकार?, संभाव्य नावं समोर

मुंबई | येत्या 19 सप्टेंबरपासून ‘बिग बाॅस मराठी 3’च्या पर्वाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता हा लोकप्रिय रिअॅलिटी शो अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातच सोशल मीडियावरही या रिअॅलिटी शोची जोरदार चर्चा सुरू आहे. कोणते कलाकार यावर्षी बिग बॉसमध्ये झळकणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

आता या पर्वामध्ये कोणते कलाकार झळकणार आहेत त्यांची नाव समोर आली आहे. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या सीझन 3 मध्ये अभिनेत्री गायत्री दातार, संग्राम समेळ, नेहा जोशी, शाल्मली खोलगडे, आनंद इंगळे, चिन्मय उदगीर, पल्लवी सुभाष ही मराठीतील तगडी नावं झळकण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप अधिकृतरित्या या नावांची घोषणा झालेली नाही.

दिग्गज अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करतात. मांजरेकरांच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे यंदाच्या सिझनची सूत्रंसंचालनाची धुराही महेश मांजरेकर सांभाळताना दिसणार आहेत.

दरम्यान, कोरोनामुळे गतवर्षी बिग बाॅस पाहायला भेटला नाही म्हणून यंदाच्या पर्वासाठी प्रेक्षक खूपच आनंदात आणि उत्सुकतेत असल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या –  

राज कुंद्रा प्रकरणात मोठी अपडेट; आता शिल्पा शेट्टी बनणार साक्षीदार

एयरोस्पेस कंपनीनं 9 वर्षांनी रचला इतिहास, पहिल्यांदाच सामान्य नागरिक झेपावले अंतराळात

मराठा सेवा संघ भाजपसोबत?, पुरुषोत्तम खेडेकरांच्या नव्या लेखानं खळबळ

चेन्नई सुपर किंग्जसाठी वाईट बातमी; सामन्याआधी चेन्नईचं टेंशन वाढलं

देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More