महाराष्ट्र मुंबई

ठाकरे सरकारचा ‘हा’ निर्णय उच्च न्यायालयाने बदलला

मुंबई | मनोरंजन क्षेत्रात काम करणार्‍या 65 वर्षांवरील सर्व व्यक्तींना मुंबई उच्च न्यायालयाने मालिका-चित्रपटाच्या सेटवर काम करण्याची परवानगी दिली आहे. हायकोर्टाने ठाकरे सरकारचा आदेश बाजूला ठेवत निर्णय दिला.

65 वर्षांवरील चित्रपट, टीव्ही कलाकार आणि क्रू मेंबर्सना स्टुडिओ किंवा आऊटडोअरसेटवर काम करण्यास राज्य सरकारने मनाई केली होती. मात्र सरकारने जारी केलेले दोन ठराव मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले आहेत.

चित्रपट व टीव्ही कलाकार प्रमोद पांडे आणि इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशनच्या वतीने वकील अशोक सरोगी यांच्यामार्फत दाखल केलेल्या दोन याचिकांवर खंडपीठाने निर्णय दिला.

65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी लागू असलेल्या इतर सर्व नियमावली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्या पासष्टीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांनाही लागू असतील, असंही  न्यायमूर्ती एस. जे. काठावाला आणि आर. आय. चगला यांच्या खंडपीठाने सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर

“भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक”

मनसे नगरसेवकावर अजित पवार भडकले, म्हणाले…

पावसामुळे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील छताचा भाग कोसळला

पाच दिवसात सोने दरात मोठी वाढ; पाहा काय आहे आजचा भाव…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या