महाराष्ट्र मुंबई

सुशांत सिंग राजपूतच्या कामाची उच्च न्यायालयाने केली प्रशंसा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या अभिनयाची उच्च न्यायालयाने प्रशंसा केलीये. तो एक चांगली व्यक्ती होती, हे त्याच्या चेहऱ्यावरून कोणीही सांगू शकेल, असं उच्च न्यायालयाने म्हटलंय.

रियाने सुशांतच्या बहिणी प्रियांका व मीतू यां गुन्हा रद्द करण्यासाठी या दोघींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील निर्णय न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने राखून ठेवला.

लिमेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डॉक्टर रुग्णांशी ऑनलाईन चर्चा करून औषध देऊ शकतात. कोरोनामुळे सुशांत स्वतः डॉक्टरांना भेटू शकला नाही. तसेच त्याने ते औषध घेतलं, याचे काही पुरावे नाहीत, असं प्रियांका व मीतू यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी न्यायालयाला सांगितलं. यावर मुंबई पोलिसांच्यावतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

राजपूत आणि त्याची बहीण प्रियांका यांच्यात व्हाॅट्सॲपद्वारे झालेल्या चॅटमधून निदर्शनास आले आहे की, तिने राजपूत आणि डॉक्टर यांच्यात कन्सल्टेशन न होताच औषधांचे प्रिस्क्रिप्शन दिलं. 8 जून 2020 रोजी एक अनोळखी व्यक्ती राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेली. टोकन घेतल्यानंतर त्या आरोपीने डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडून प्रिस्क्रिप्शन घेतलं. पोलिसांकडे पुरावे आहेत, असं कामत यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, 2 बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार

राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे- राजेश टोपे

ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब आहे- देवेंद्र फडणवीस

मला महिलांच शरीर आवडतं, पण डोकं नाही- राम गोपाल वर्मा

नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या