बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी बँकेत जास्त व्याजदर तर मॅकडॉनल्ड्समध्ये घसघशीत सुट

मुंबई | देशभरात कोरोनाचा हाहाकार माजला असतानाच सरकारतर्फे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी अनेक ठिकाणी विशेष सवलती मिळत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच मॅकडॉनल्ड्स व बँकांच्या ठेवीवर लसीकरण केलेल्या नागरिकांना सवलत देण्यात येत आहे.

लसीकरण केलेल्या नागरिकांना मॅकडॉनल्ड्स या फुड चैन बिजनेसतर्फे 500 रुपयांच्या ऑर्डरवर 20 टक्के सवलत देण्यात येत आहे. मॅक्डोनल्डसच्या उत्तर आणि पूर्व भारतातील सर्व आऊटलेट्समध्ये ‘वूई केअर’ हे अभियान सुरू करण्यात आलं असून बर्गर आणि स्नॅक्ससाठी प्रसिद्ध असलेल्या मॅकडॉनल्ड्समध्ये लसीकरण प्रमाणपत्र दाखवल्यानंतर 20 टक्‍क्‍यांची घसघशीत सूट मिळणार आहे.

दिल्ली येथील अनेक हॉटेल्सकडून यापूर्वीच लसीकरण केलेल्या नागरिकांना हॉटेलमधील जेवणावर सूट दिली जात होती. त्यानंतर लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना उबर या कंपनीतर्फे लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी व परत येण्यासाठी मोफत कार राइडही देण्यात येत आहे.

सेंट्रल बँकेमध्ये लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी बँकेच्या ठेवीवर ‘इम्यून इंडिया डिपॉझिट स्कीम’ अंतर्गत अतिरिक्त व्याजदर देण्यात येत आहे. तसेच यानुसार 1111 दिवसांच्या ठेवी साठी 5.35% व्याज दिले जात आहे. इतर ग्राहकांसाठी हाच व्याजदर 5.10 टक्के एवढा आहे. लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कंपन्या व संस्था पुढे येत असताना पाहायला मिळत आहे त्यामुळे लसीकरणासाठी जनजागृती होत असून सवलती मिळवण्यासाठी नागरिक लसीकरण करून घेतील, हा यामागचा हेतू आहे.

थोडक्यात बातम्या –

ED ची मोठी कारवाई ; अविनाश भोसलेंची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता सील

“जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्यांचा मुख्यमंत्री होईल,असं म्हटल्यास गैर काय?”

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

बायको मुलं भेटायला येत नसल्याने कारागृहात कैद्याचा अन्नत्याग; पोलिसांनी केला हस्तक्षेप अन्…

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; नव्या कोरोनाबाधितांची संख्या 500च्या घरात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More