गोल्डकोस्ट | राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या हीना सिद्धूनं सुवर्णपदक पटकावलं. तिनं 25 मीटर रॅपीड पिस्टल प्रकारात 38 गुणांची कमाई करत ही कामगिरी केली.
विशेष म्हणजे हीनाचे या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करत सुवर्णपदकासोबत नवीन रेकॉर्डही केला आहे. तिनं यापूर्वी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात रौप्यपदक जिंकलं होतं.
हीनाच्या या कामगिरीनंतर भारताच्या खात्यात 11 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्यपदकं जमा झाली आहेत. एकूण 20 पदकांसह भारत पदतालिकेत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- आमदार शिवाजी कर्डिलेंची भाजपमधून हकालपट्टी करा!
- लहान मुलाचे अपहरण, अपहरणकर्त्याकडून प्रेयसीची मागणी!
- शिवसैनिकांचं दुहेरी हत्याकांड, 600 शिवसैनिकांवरच गुन्हे दाखल
- उरला सुरला भ्रष्टाचार आमच्या दुसऱ्या कार्यकाळात संपवू!
- सलमानच्या 12 चाहत्यांना दुःख देणाऱ्या चोराला अटक
Comments are closed.