बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्मृती मंधानाचं ऐतिहासिक शतक! अशी कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटर

मुंबई | सध्या आयपीएलचा थरार रंगलेला असताना भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या चालू असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात आज सलग दुसऱ्या दिवशी भारतीय महिला संघाने चांगली कामगिरी बजावल्याचं पहायला मिळालं. या सामन्यात स्मृती मंधानानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डे-नाईट सामन्यात भारताची स्मृती मंधानानं शतक झळकवलं आहे. हा सामना पिंक बाॅलने खेळला जात आहे. पिंक बाॅल कसोटी सामन्यात शतक झळकवणारी स्मृती ही पहिली भारतीय क्रिकेटपटू बनली आहे. त्यामुळे सध्या स्मृतीवर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.

पाऊस सुरु असल्यामुळे कालचा सामना लवकर संपवण्यात आला. त्यामुळे स्मृतीला शतक साजरं करण्यासाठी आणखी एक दिवसाची प्रतिक्षा करावी लागली. तिनं 170 चेंडूत 18 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं हे ऐतिहासिक शतक ठोकलं आहे.

दरम्यान, पिंक बाॅल कसोटीत शतक झळकवणारी विराट कोहलीनंतर मंधाना दुसरी क्रिकेटपटू आहे. विराटनं 2019 मध्ये कोलकाता कसोटीत बांगलादेशविरुद्ध 136 धावा केल्या होत्या.

थोडक्यात बातम्या – 

लहान मुलांसाठी महत्त्वाची बातमी ! पुण्यात ‘या’ लसीची ट्रायल सुरू

बाबो! बिस्कीट खाल्लं नाही तर मुलांच्या जीवाला धोका; ‘या’ शहरात पसरली अफवा अन्…

“चंद्रकांत पाटलांनी 15 डिसेंबरची मुदत दिली होती, म्हणजे 6 महिने…”

प्रा. दत्तात्रय चव्हाण यांना अर्थशास्त्र विषयात Ph.D.पदवी

मान्सून हंगाम संपला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार परतीचा पाऊस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More