खेळ

हिटमॅन रोहित शर्माने केली एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

माऊंट मोउनगुई | आज झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने 77 चेंडूत 62 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारत त्याने धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 

रोहितचे भारताकडून खेळताना एकदिवसीय सामन्यात 215 षटकार पुर्ण झाले आहेत. तो भारतीय फलंदाजांच्या यादीत धोनीसह पहिल्या क्रमांकावर आला आहे. 

धोनीने भारताकडून 334 एकदिवसीय सामने खेळताना 215 षटकार मारले आहेत. तर रोहितने चक्क 199 एकदिवसीय सामने सामने खेळत 215 षटकारांचा साज चढवला आहे.

दरम्यान, धोनीने आपल्या कारकिर्दीत आशिया खंडाकडून 3 एकदिवसीय सामने खेळत 7 षटकार मारले आहे. त्यामुळे त्याने एकदिवसीय सामन्यात 222 षटकार मारले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-श्रीगोंद्यात भाजपला बहुमत, मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा…

-जर कोणी डिवचलं तर त्यांना आम्ही सोडत नाही- नरेंद्र मोदी

“हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात मुळापासून तोडून टाका”

-भारतीय संघाची मोठी दहशत; आता न्यूझीलंड पोलिसांनीही घेतली दखल

-भाजपच्या अतुल भोसलेंना काही जमलं नाही; पृथ्वीराज चव्हाणच ठरले किंग…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या