बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जम्मू-काश्मीरमध्ये 3 कुटूंबांची दादागिरी यापुढे बंद’; अमित शहा यांचा जम्मू-काश्मीरच्या नेत्यांना इशारा

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू केल्यानंतर त्याठिकाणी अनेक गोष्टी बदलल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे उमर अब्दूल्ला केंद्र सरकारवर कलम 370 च्या मुद्यावरून सातत्याने टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरसाठी असणारे कलम 370 आणि 35 अ पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी हटवले आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना आपला हक्क मिळाला. भारतीय राज्यघटनेेचे सर्व हक्क येथील नागरिकांना मिळत आहेत. राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. यापुढे जम्मू-काश्मीरमध्ये तीन कुटूंबाची दादागिरी चालणार नाही, असा थेट इशारा अमित शहा यांनी दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 4 वरून 7 झाली आहे. तसेच त्यावेळी फक्त 500 विद्यार्थी शिकू शकत होते. मात्र आम्ही केलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता 2 हजार विद्यार्थांना प्रवेश मिळणार आहे. मागील 70 वर्षाहून अधिक काळ तीन कुटूंबांनीच जम्मू-काश्मीरवर राज्य केलं, परंतु त्यांची सत्ता आता परत येऊ देणार नाही, असंही अमित शहा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अलिकडेच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दूल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. केंद्र सरकारने लागू केलेल्या 370 कलमानंतर राज्याची परिस्थिती खुप वाईट झाली आहे. याठिकाणी दहशतवादी कारवाया देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप देखील अब्दूल्ला यांनी केंद्र सरकारवर केला होता.

थोडक्यात बातम्या-

“आरोग्य विभागातील परिक्षेच्या गोंधळाला राजेश टोपेच जबाबदार त्यांनी राजीनामा द्यावा”

“…किंवा तू तरी गांजा मारून व्हिडीओ पोस्ट केलाय”

“मी तर आधीपासून सांगत आहे, राज्य सरकारनं आता तरी…”; नवाब मलिकांनी केली महत्वाची मागणी

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल; उस्मानाबादमधील ‘त्या’ घटनेवरून चाकणकर कडाडल्या

उस्मानाबादच्या डान्स बारवरून अमोल मिटकरी आक्रमक, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More