बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदयद्रावक! बहिणीला साडी आणायला गेलेला भाऊ परत आलाच नाही…

पुणे | भारतीय संस्कृतीमध्ये नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करतात. रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या निखळ प्रेमाचा दिवस असतो. बहिण भावाच नातं घट्ट करणाऱ्या या दिवशी बहिण भावाला राखी बांधत असते आणि भावाकडुन बहीणीला काहीतरी भेटवस्तू दिली जाते. मात्र पुण्यात बारामतीमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी बारामती मध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे.

आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी आणायला गेलेला भाऊ माघारी आलाच नाही. प्रशांत गोरे असं तरूणाच नाव आहे. प्रशांत गोरे हा बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील रहिवासी आहे. तो होमगार्ड होता आणि वडगांव निंबाळकर या पोलीसस्टेशन अंर्तगत होमगार्ड पदावर काम करत होता.

रक्षाबंधनच्या दिवशी पुण्याहुन प्रशांतची बहिण त्याला राखी बांधण्यासाठी आली होती. बहिणीने राखी बांधली मात्र भावाने काहीच भेटवस्तु आणली नव्हती. राखी बांधल्यानंतर बहिणीला काहीतरी ओवाळणी द्यावी म्हणून प्रशांत मोरेगाव याठिकाणी जात होता. तिथे तो एका दुकानात थांबला. त्याला अचानक चक्कर आली आणि त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. तेथील नागरिकांनी त्याला मोरगाव येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यु झाला होता.

दरम्यान, रक्षाबंधनासारख्या पवित्र दिवशी आपल्या बहिणला भेटवस्तु आणायला गेलेल्या प्रशांतवर काळाने घाला घातला. प्रशांतची बहिणील या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. तर  बारामती परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! अफगाणिस्तानमधून आलेल्या ‘इतक्या’ लोकांची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह

इंग्लंड संघाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहला जखमी करण्याचा प्रयत्न करणारा इंग्लिश गोलंदाज बाहेर

“मंदिरं उघडताना तिसरी लाट आडवी येते, मग दारूची दुकानं कोरोनाप्रूफ आहेत का?”

‘अजितदादा काय म्हणतात त्याला….’; अजित पवारांच्या टीकेला पडळकरांचं जोरदार प्रत्युत्तर!

अफगाणिस्तानातील भारतीयांसाठी केंद्राची हालचाल??; उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More