बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडखोर आमदार राहिलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं एकूण बिल किती?; आकडा वाचून धक्का बसेल

मुंबई | नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत सेनेच्या 39 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांसोबत सुरतला पोबारा केला. त्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आणि सर्वच पक्ष आणि नेते कामाला लागले.

त्यानंतर पुन्हा या बंडखोर आमदारांची सेना आणि त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपशासित राज्य आसामच्या राजधानीच्या शहरात तळ ठोकला.  बहुमत चाचणी देण्याकरीता जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावलं तेव्हा हे सर्व आमदार गोव्यात एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये उतरले.

हॉटेल अधिकाऱ्यांनी बिलाची रक्कम सांगण्यास नकार दिला. नाव न सांगण्याच्या अटीवरुन हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने माहिती दिली. खोल्यांचे भाडे जवळपास 70 लाख तर, 8 दिवसांच्या जेवणावर झालेला खर्च सुमारे 22 लाख आल्याचं समजतंय.

एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यावर स्वत:च्या पदाला आणि पेशाला न शोभणारी नृत्ये आमदारांनी केली आणि मुख्यमंत्र्यांचा ओरडा खाल्ला. आता सर्वांना त्यांच्या या हॉटेलवारीचे बिल जाणून घेण्याची उत्सुक्ता लागली आहे. आता त्याची माहिती समोर आली आहे. जवळपास 68 – 70 लाख रुपये खर्च आल्याची माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या – 

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा- देवेंद्र फडणवीस

‘उपमुख्यमंत्री होण्याची फडणवीसांची इच्छा नव्हतीच पण…’; भाजप नेत्याचा मोठा खुलासा

‘भविष्यात असे प्रकार…’; टेबलवर चढून नाचणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं

“…म्हणून महाराष्ट्र, सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करावा लागला”

उपमुख्यमंत्री होताच फडणवीस अ‌ॅक्शन मोडमध्ये, ओबीसी आरक्षणासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More