बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! हॉटेलमध्ये पोळी लाटताना कर्मचाऱ्याने केलं ‘हे’ कृत्य

नवी दिल्ली। मनुष्य हा असा प्राणी आहे ज्याला अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी दैनंदिन जीवनात गरजेचं असतात. आपण अगदी लहानपणापासून ऐकत असतो की, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं.

मात्र, उत्तरप्रदेशमध्ये एक अतिशय लाजिरवाणी गोष्ट उघडकीस आली आहे. नाजीबाबाद जवळील जलालाबाद येथील हॉटेलमध्ये कर्मचारी पोळी करत असताना चक्क त्यामध्ये थुंकत असल्याची धक्कादायक माहिती माध्यमांच्या समोर आली.

उत्तरप्रदेशच्या बिजनौर हॉटेलमध्ये अरबाज नावाचा कर्माचारी त्यावर थुंकत असताना पकडला गेला. शिवाय हे कृत्य करतानाचा त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांना याबाबची माहिती मिळताच त्यांनी अरबाजला तब्यात घेतलं. असे प्रकार या आधी देखील लखनौ आणि मेरठमध्ये घडले होते.

जलालाबाद येथील सदाबहार नावाचे हॉटेल आहे. तिथे जेवायला आलेल्या एका ग्राहकाने हा प्रकार पाहिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो कर्मचारी पोळी बनवायचा आणि त्यामध्ये थुंकीचा वापर करून तशीच ती हॉटेल मध्ये आलेल्या ग्राहकांना द्यायचा. हे पाहताच त्या ग्राहकाने आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद केलं आणि त्या कर्मचाऱ्याला पोलिसांच्या तब्यात दिलं. पोलिसांनी याविरोधात कलम 269 आणि 270 अन्वेय गुन्हा दाखल केला आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष?; ‘या’ नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

“कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचं नामांतर होऊ देणार नाही, गरज पडल्यास रस्त्यावर उतरू”

अभिनेत्री रश्मिकाला पहिल्या चित्रपटासाठी मिळाली होती ‘एवढी’ रक्कम!

धक्कादायक! कुत्रा भुंकल्यामुळे मालकासह तिघांना लोखंडी रॉडने मारहाण

“संभाजी महाराजांचं नाव द्यायचं असेल तर ते पुणे शहराला देऊन दाखवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More