बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आता ‘या’ वेळेपर्यंत राहणार खुली; वाचा काय आहे नवी नियमावली

मुंबई |  कोरोना महामारीनंतर आता कुठे परिस्थिती पुन्हा एकदा स्थिर होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्याही नियंत्रणात येत असल्याने आता राज्य सरकारने नियम शिथील करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता सरकारने मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल्स, दुकाने यांच्यावरील निर्बंध कमी केले आहेत.

आता दिवाळीच्या तोंडावर हॉटेल्स उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्री 12 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर सर्व प्रकारच्या दुकानांना रात्री 11 पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी टाक्स फोर्ससोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाने आता कोरोनासंदर्भातील सर्वच निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी तर निर्बंध अगोदरच शिथील करण्यात आले आहेत.  राज्यातील शाळा आणि महाविद्यालये  सुरू करण्यात आली आहेत. तर बऱ्याच दिवसांपासून कलाकार मागणी करत असल्याने 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व चित्रपटगृहदेखील खुली करण्यात येणार आहेत.

या शिवाय लसीचे 2 डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगीही देण्यात आली आहे. लवकरच 1 डोस घेतलेल्या नागरिकांनाही रेल्वेप्रवास आणि मॉलमध्ये परवानगी देण्यासाठी विचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतंच सांगितलं होतं. त्यामुळे आता जवळपास एक ते दीड वर्षानंतर नागरिकांना पुन्हा पहिल्यासारखं चित्र अनुभवता येणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

देशातील नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ, पाहा ताजी आकडेवारी

आधी कुत्रा माणसाला चावला मग माणूस कुत्र्याला चावला अन् नंतर…

राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू, मात्र पुणे जिल्ह्यांबाबत अजून शंकाच

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा पुन्हा भडका, या महिन्यातील आज 15वी दरवाढ

‘…यामुळे बॉलिवूड नेहमीच शिक्षा भोगत आलं आहे’, ड्रग्ज प्रकरणात जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More