बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, तिकीट निश्चिती आरक्षणाचे नियम बदलले

नवी दिल्ली | भारतीय रेल्वे ही कायम आपल्या हितकारी निर्णयासाठी ओळखली जाते. प्रवासी हिताचा निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला सोयीसुविधा पुरवणे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही आपली जबाबदारी भारतीय रेल्वे चोखपणे सांभाळत असल्याचं आपण पाहतो. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्यापण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

आपण एखाद्या प्रवासाला जायचं ठरवलं की, रेल्वेचं आरक्षण करतो. मग अचानक आपलं नियोजन रद्द झालं तर आपण भरलेली रक्कम ही परत मिळताना त्यामध्ये काही प्रमाणात कपात केली जाते. पण आता यामध्ये रेल्वेने मोठा बदल केला आहे. प्रवासी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने तिकीट निश्चिती आरक्षणाचे नियम बदलले आहेत. यामुळे तुमच्याकडे आता दुसरा पर्याय असणार आहे.

आता तुम्ही तुमच्या प्रवासाची तारीख बदलु शकता. एवढंच नव्हे तर तुम्ही तुमच्या प्रवासाचं ठिकाण देखील बदलू शकता. स्थानिक रेल्वे स्थानकावरील व्यवस्थापकाकडे एक अर्ज करावा लागेल हा अर्ज देऊन किंवा जवळच्या इंटरनेट सेंटरवर जाऊन रेल्वे सुटायच्या 24 तास अगोदर तुम्हाला हे आरक्षण रद्द करता येईल.

तुम्ही तुमचा प्रवास हा आरक्षित ठिकाणापेक्षा पुढे करू इच्छीत असाल तरी तुम्ही तिथे तसा बदल करु शकता. असं केलं असेल तर याची माहिती तुम्हाला तिकीट तपासणीसाला द्यावी लागेल. सुरक्षित व आरक्षित प्रवास या विचाराला सोबत घेऊन भारतीय रेल्वे काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

व्हाॅट्सअ‍ॅपचं नवं फिचर; लवकरच ‘या’ नव्या इमोजींचा होणार समावेश

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत होणार ‘या’ मास्कचा उपयोग; संशोधकांचं अनोखं तंत्रज्ञान

मुंबई लोकल सेवा लवकरच सुरू; क्युआर कोडच्या माध्यमातुन प्रवाशांना काढता येणार पास

पीओपी गणेश मुर्तींवर कडक बंदी, चुक कराल तर भराल 10 हजारांचा दंड

मंदिरं उघडण्याचा निर्णय नाहीच?; टास्क फोर्सच्या बैठकीनंतरही कोणती घोषणा नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More