देश

महात्मा गांधींनी आत्महत्या कशी केली? गुजरातच्या शाळेत विद्यार्थ्यांना खळबळजनक प्रश्न

गांधीनगर | राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आत्महत्या कशी केली? असा धक्कादायक प्रश्न गुजरातच्या शाळेत विद्यार्थ्यांना विचारण्यात आला आहे. या प्रश्नाने गुजरातसह देशात खळबळ माजली आहे. याप्रकरणी शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

गुजरातच्या गांधीनगर जिह्यातील माणसा या गावातल्या शाळेत नववीच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नासाठी चार गुण दिलेले आहेत. स्कुल विकास संकुलतर्फे नववीच्या विद्यार्थ्यांना गुजराती विषयात हा प्रश्न विचारण्यात आला आहे.

गांधीजींवरच्या आक्षेपार्ह प्रश्नावरून गुजरातमध्ये सध्या बराच वाद रंगला आहे. यावर ही प्रश्नपत्रिका गुजरात शिक्षण मंडळाची नाही आणि असा प्रश्न विचारणे ही देखील चूक आहे, असं स्पष्टीकरण गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा यांनी दिलं आहे.

दरम्यान, असा प्रश्न विचारण्याने विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रावस्था निर्माण होऊ शकते. यावर चौकशी करून कारवाई करू, असं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या